सुधाकर देशपांडे - लेख सूची

भगवान गौतम बुद्धांचा वैज्ञानिक धर्म (उत्तरार्ध)

गौतमांनी आप्तप्रामाण्य नाकारले, शब्द-पूजा नाकारली, गुरू नाकारले, कोणतेही मत-कसोटीवर घासून त्याच्या सत्यतेचा प्रत्यय आल्याशिवाय मान्य करू नये, असे गौतमांनी सांगितले; कुठल्याही दुसऱ्या बाह्य ज्ञानी पुरुषाला शरण न जाता केवळ स्वतःला म्हणजे स्वतःमधील बुद्ध-स्वरूपाला शरण जावे; आणि आपल्यामधले अव्यक्त बुद्धत्व व्यक्त करून बुद्ध-पदाला पोहोचलेल्या गौतमांसारख्या महात्म्याचा ‘सल्ला’ घेत घेत प्रत्येकाने स्वतःच स्वतःची वाटचाल करावी; हे सारे …

भगवान गौतम बुद्धांचा वैज्ञानिक धर्म (पूर्वार्ध)

धर्माचे अधिष्ठान ‘विश्वास’ हे आहे अशी सर्वसाधारण समजूत असल्याचे आढळते. स्वतः कुठल्याही चिकित्सेच्या फंदात न पडता, धर्मग्रंथांचे आणि परंपरेने शिरोधार्य मानलेल्या ऋषिमुनींच्या वचनांचे प्रामाण्य जो निमूटपणे मान्य करतो तो धार्मिक मानला जातो. विवेक आणि अनुभव यांची कास धरून चालणारे विज्ञान आणि हे दोन निकष गैरलागू मानणारा धर्म यांच्या भूमिका अगदीच वेगळ्या आणि परस्परविरुद्ध आहेत असे …

प्रयत्नवादाचे फसवे तत्त्वज्ञान 

आपल्या काम-क्रोधादि षड्रिपूंवर मात करायची असेल तर त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे अशी शिकवण पारंपरिक साधुसंतांनी दिलेली आहे. आमचा सारा समाज अशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुद्धा अविरतपणे प्रयत्नवादाचा पुरस्कार करीत असतो. आमची प्रचलित शिक्षण पद्धती प्रयत्नवादावरच आधारलेली आहे. आई-वडील, शिक्षक, समाजधुरीण, आध्यात्मिक गुरु सारेच अव्याहतपणे आक्रोश करीत असतात “प्रयत्न करा, प्रयत्न करा.”  आज मी …

धर्म आणि श्रद्धा

धर्मचिकित्सा करणा-या विद्वानांचे, ढोबळ मानाने, दोन वर्ग आहेत. एक वर्ग आहे – धर्म मानणा-या आस्तिकांचा, तर दुसरा आहे-धर्म न मानणा-या नास्तिकांचा. आस्तिक धर्मचिकित्सक हे सिद्ध करू पाहतो की धर्म ही अत्यंत कल्याणकर (किंबहुना, एकमेव कल्याणकर) बाब आहे. उलट, नास्तिक धर्मचिकित्सक हे दाखवू पाहतो की धर्म ही अत्यंत घातक आणि मानवाला सर्वस्वी अशोभनीय बाब आहे. धर्मचिकित्सकांच्या …

डॉ. भीमराव गस्ती – एक व्रतस्थ जीवन

‘चोर-दरवडेखोर’ अशी मुद्रा धारण करणार्‍या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशातील बेरड-रामोशी जमातीत जन्माला आलेला एक कर्तृत्ववान माणूस – भीमराव गस्ती. उच्चभ्रू सभ्य समाजाच्या कुत्सित निंदेचे विषारी बाण सहन करीत केवळ जिद्द आणि कष्ट यांच्या भरंवशावर अत्युच्च शिक्षण घेऊन एक उच्च विद्याविभूषित शास्त्रवेत्ता झाला, केमिस्ट्रीत पीएच्.डी. ही अत्युच्च पदवी मिळविली. मनात आणले असते तर इतर विद्याविभूषितांसारखेच डॉ. गस्तींनाही …